You must be logged in to post a review.
देवराई आख्यान ( Devrai Akhyan )
₹696.00
तीन दशकांहून अधिक काळ देवराया आणि पवित्र निसर्ग यांवर संशोधन करणाऱ्या अर्चना जगदीश या देवराई संरक्षणाच्या प्रत्यक्ष कामातही गुंतलेल्या आहेत. देवराई म्हणजे पवित्र वन. शेकडो वर्षे अतीव श्रद्धेने माणसांनी या देवरायांची जपणूक केली आहे. अर्चना जगदीश यांचा हा ग्रंथ पर्यावरण क्षेत्रातले देवरायांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा आहे. माणूस आणि सृष्टी यांच्या आदिम नात्यातून निर्माण झालेल्या आणि संस्कृतीच्या अतिदीर्घ प्रवासातही टिकून राहिलेल्या या पवित्र वनांमागच्या लोकधारणांना आसेतुहिमाचल वेध या ग्रंथात गोष्टीवेल्हाळपणे घेतलेला आहे.
जगभरातल्या माणसांनी निर्माण आणि जतन केलेल्या निसर्ग संरक्षणाच्या परंपरांची ओळख करून देत असतानाच या परंपरांचा आदर करत पर्यावरणविषयक नव्या आव्हानांना सामोरे कसे जाता येईल, याचा विचार करणारे हे अनुभवसिद्ध आख्यान म्हणजे देवरायांच्या अभ्यासातला मैलाचा दगड आहे.
Reviews
There are no reviews yet.