हे पुस्तक म्हणजे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदीप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी आहे.
थोरले बाजीराव पेशवे यांच्या समग्र जीवनाचा आणि सन १६८९ ते १७४० या ५२ वर्षांत मराठ्यांनी साम्राज्य निर्माणाचा जो प्रचंड खटाटोप केला त्या प्रयत्नपर्वाचा वेध घेणारे हे पुस्तक आहे. थोरले बाजीराव पेशवे म्हणजे पराक्रमात तेजाने तळपलेलं एक झुंझार, झंझावाती आयुष्य ! अनेक अस्सल ऐतिहासिक संदर्भ साधनांचा शोध घेऊन आणि इतिहासाशी प्रमाण राखून तो झंझावात कवेत घेण्याचा हा एक प्रयत्न प्रसिध्द कादंबरीकार काका विधाते ह्यांनी त्यांच्या ह्या महाकादंबरीत केला आहे. या महाकादंबरी संचात ३ खंड आणि एक पुस्तिका आहे. ३ खंडात संपुर्ण कादंबरी सामावलेली आहे, तर पुस्तिकेत अनेक इतिहासकारांच्या बाजीरावांवरील प्रतिक्रिया, बाजीरावांच्या जीवनाचा कालानुक्रम, मस्तानी कुलवती की कलावंतीण या बद्दलचे विचार, नकाशे, छायाचित्रे, वंशावळ व इत्यंभुत संदर्भसुची दिलेली आहे. त्यामुळे हि बाजीराव पेशवेंच्या जीवनावरील एक भूतो न भविष्यति अशी एक महाकादंबरी ठरलेली आहे.
Reviews
There are no reviews yet.