Prafullata Prakashan

अंत्राळी

220.00

माऊलीचा मळा या कथेतून प्रथमच काळाच्या ओघात वारीचे बदललेले स्वरूप वारकऱ्यांमध्येही शिरलेल्या अपप्रवृत्ती व त्यांचा संधिसाधूपणा यावर प्रकाश पडतो या विषयावर अशा तऱ्हेने लिहिलेली वास्तवदर्शन घडविणारी ही पहिलीच कथा असावी.
 – रेखा साने इनामदार
(‘साप्ताहिक सकाळ’ स्पर्धेच्या परीक्षणातून)

लेखकाची मूळं ग्रामीण परिसरात किती खोलवर घट्टपणे रुजली आहेत, याची प्रचिती त्यांच्या ‘नकोसा’, ‘होरपळ’, ‘दावं’, ‘अंत्राळी’सारख्या कथांमधून येते. ग्रामीण भागातल्या स्त्री-पुरुषांच्या घामाचा परिमळ या कथांना आहे. यातले काही अनुभव तर इतके कडूशार आहेत की त्याची चव पुन्हा नको असं वाटत राहतं. पण ते मात्र संवेदशील वाचकांच्या मागं मागं येत राहतात आणि जीवाला घायाळ करून सोडतात. ग्रामीण स्त्रियांच्या अबोल दुःखवेदनांचे हुंकार आपल्याला जागोजागी या कथांमधून ऐकू येतात. त्याला आपण शहरी वाचक कसा प्रतिसाद देणार हा कळीचा प्रश्न आहे. एकूणच या सर्व कथांकडे साहित्यिक अंगापेक्षा सामाजिक अंगानं बघणं जास्त गरजेचं आहे. कारण स्वातंत्र्य, समता, मैत्रभाव आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यावर आधारित परिवर्तनासाठी या कथांचं योगदान मोलाचं आहे, असं मला वाटतं. कथेतील सर्जनशील भावनेच्या ओलाव्यामुळे विचारांची भूमी सफल समृद्ध व्हायला मदत होते, यावर माझा विश्वास आहे.

Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अंत्राळी”